राज्य सरकार देणार 20 लाख रुपये बिनव्याजी कर्ज; त्वरित करा अर्ज…

20 lakh interest free loan: सरकारकडून देशातील प्रत्येक नागरिकांसाठी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. आता सरकार २० लाख पर्यंत बिनव्याजी कर्ज देणार आहे. याच बदल आज आपण या लेखाद्वारे जाणून घेणार आहोत.

मागास प्रवर्गातील विद्यार्थी तसेच जे विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्यास उत्सुक असतील याचसह राज्यांतर्गत व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यावयाचा असेल अश्या विद्यार्थ्यासाठी सरकार बिनव्याजी कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे.

सरकार कर्जावरील व्याजाची रक्कम देण्याची व्यवस्था करणार आहे. व्याज कसे भरायचे या चिंतेतून सुटका होऊ शकते. त्यासाठी इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या वेबसाइटला भेटदेणं आवश्यक आहे.

शैक्षणिक कर्ज व्याज परतफेड योजनेसाठी अर्ज ऑनलाइन करायचा आहे.  कर्जाचे व्याज परतफेड महामंडळाकडून केले जाते.

इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ ओबीसी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी बँकांमार्फत मंजूर केलेल्या 20 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाच्या रकमेवर व्याज परतावा वितरित करते.

या व्यतिरिक्त, आंतर-राज्य आणि देशांतर्गत व्यवहारांसाठी महामंडळाकडून कमाल 10 लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवरील व्याज परतावा वितरित केला जातो.

या योजनेमुळे इतर मागासवर्गीयांच्या गरजू आणि भावी विद्यार्थ्यांना त्यांचे करिअर विकसित करण्यात मोठे योगदान मिळणार आहे.

Table of Contents

योजनेसाठी लाभार्थी पात्रतेच्या अटी व शर्ती;

 • 17 ते 30 वर्षे  असे अर्जदाराचे वय असणे आवश्यक आहे.
 • यासह इतर मागास प्रवर्गातील असणे तसेच तो महाराष्ट्राचा रहीवासी असावा.
 • अर्जदाराच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामीण आणि शहरी भागासाठी 8 लाख रुपयांपर्यंत असणे आवश्यक आहे.
 • बारावी 60 टक्के गुणांसह अर्जदार उत्तीर्ण असावा.
 • तसेच, पदवीच्या अंतिम वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी ६० टक्के गुणांसह डिप्लोमा उत्तीर्ण केलेला असावा.
 • अर्जदाराचा CIBIL क्रेडिट स्कोअर किमान 500 पेक्षा जास्त असावा.

कर्ज करताना लागणारी आवश्यक कागदपत्रे;

 • मागास प्रवर्गातील जातीचा दाखला
 • तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला
 • तहसीलदार यांचा महाराष्ट्र रहिवासी (वय अधिवास) दाखला
 • आधार कार्ड (अर्जदार व अर्जदाराचे पालक)
 • ज्या अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक कर्ज घेणार आहे त्या अभ्यासक्रमाची पात्रता परिक्षा उत्तीर्ण गुणपत्रिका.
 • पासपोर्ट फोटो (अर्जदार व अर्जदाराचे पालक)
 • अर्जदाराचा जन्माचा व वयाचा पूर्व असं आवश्यक आहे.
 • शैक्षणिक शुल्क संबधित पत्र
 • शिष्यवृत्ती (Scholarship)
 • शैक्षणिक शुल्कमाफी (Freeship)
 • पात्रतेबाबतचे प्रमाणपत्र असावे.
 • मान्यताप्राप्त संस्थेत प्रवेश घेतल्याचा पुरावा
 • आधार संलग्न बँक खाते पुरावा

शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत अभ्यासक्रम;

आरोग्य विज्ञान- MBBS,BDS,BAMS,BHMS,B.Pharm, व संबधीत विषयांतील सर्व पदवी व पदव्यूत्तर अभ्यासक्रम.

अभियांत्रिकी- B.E, B.Tech., B.Arch (सर्व शाखा ), तसेच संबधित विषयांतील सर्व पदवी व पदवीत्तर अभ्यासक्रम.

WhatsApp Group (Join Now) Join Now

व्यावसायिक अभ्यासक्रम- LLB , हॉटेल मॅनेजमेंट, फॅशन टेक्नोलॉजी, इंटेरिअर डिझाईन पदवी, बॅचलर ऑफ डिझाईन, फिल्म व टेलीव्हिजन अभ्यासक्रम, पायलट, सनदी लेखापाल, MBA,MCA SHIPPING, विषयांतील पदवी व पदवीत्तर अभ्यासक्रम.

कृषी अन्नप्रकीया व पशुविज्ञान- Animal & Fishery Sciences, B.Tech., BVSC, B.Sc.इ संबधित विषयांतील सर्व पदवी व पदव्यूत्तर अभ्यासक्रम.

देशांतर्गत अभ्यासक्रम- केंद्रीय परिषद, कृषी विद्यापीठ परिषद, शासकीय अनुदानित आणि खाजगी मान्यताप्राप्त (NACC) अभ्यासक्रम हे पात्रता परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहेत. यामध्ये आरोग्य विज्ञान, अभियांत्रिकी, व्यावसायिक व व्यवस्थापन, कृषी अन्नप्रक्रिया व पशुविज्ञान या अभ्यासक्रमाचा समावेश आहे.

परदेशी अभ्यासक्रम- यामध्ये आरोग्य विज्ञान, विज्ञान, कला, अभियांत्रिकी, व्यावसायिक अभ्यासक्रमाचा समावेश आहे.

व्याज परतफेड आणि परतफेड कालावधी;

ज्या अर्जदाराने शिक्षण पूर्ण केले आहे त्यांना बँकेने मंजूर केलेल्या कर्जाच्या नियमित परतफेडीच्या हप्त्यांमध्ये महामंडळ नियमित व्याजाची रक्कम भरेल.

जास्तीत जास्त या कर्जाचा व्याजदर 12 टक्के पर्यंत असेल. तसेच, व्याज परतफेडीसाठी कमाल 5 वर्षांचा कालावधी विचारात घेतला जाईल.

अर्जाची प्रक्रिया;

 • या योजनेचा अर्ज पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने भरला जाणार आहे.
 • यासाठी अर्ज महामंडळाच्या www.msobcfdc.org या संकेतस्थळाला भेट देणं आवश्यक आहे.

अधिक माहिती;

 • या योजनेची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,आय टी आय समोर, राहाटे कॉलोनी, नागपूर -440022 या पाट्यावर भेट द्या.
 • यासह महामंडळाच्या www.msobcfdc.org या संकेतस्थळाला किंवा ई मेल – dmobcamaravati@gmail.com वर देखील संपर्क साधून अधिक माहिती प्राप्त होईल.
 • दुरध्वनी क्रमांक – 0712-2956086

20 lakh interest free loan

Leave a comment

WhatsApp ग्रुप जॉईन करा!