EPFOची मोठी घोषणा!! PF खातेधारकांना मिळणार अधिक पैसे? वाचा सविस्तर…

EPFO Announcement: पीएफ हा प्रत्येक महिन्याला कंपनी पगारातून कापते. ती कापलेली रक्कम ती कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात जमा होते. ते पैसे म्हणजे पीएफ असतो. तर तुम्ही हे पैसे तुमच्या निवृत्तीनंतर किंवा दरम्यान काढू शकता, ही एक ऑनलाइन पद्धत आहे.

EPFO म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना असे म्हणतात. ही संघटनेमध्ये देशातील ६ कोटी पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचे खाते आहे. त्यात प्रत्येक कर्मचाऱ्याला दर महिन्याला ठराविक रक्कम मिळते.

WhatsApp Group (Join Now) Join Now

यातून येणारा पैसा वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवला जातो. कर्मचाऱ्याच्या निवृत्तीनंतर त्याला पीएफची रक्कम दिली जाते. परंतु माहितीनुसार, आता पीएफ खातेदारांना जास्त पैसे मिळनार आहेत. 

ईपीएफओ या संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्याची तयारी करत आहे. आता लवकरच मोठी घोषणा करून हा निर्णय नेमका काय आहे  हे सांगणार आहेत. मात्र खरोखरच पीएफ खातेदारांना फायदा होईल का ते आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

देशातील प्रत्येक नागरिक P.F मध्ये गुंतवणूक करताना कधीही जास्त विचार करत नाही. तसेच त्यात मोठ्या विश्वासाने गुंतवणूक करतात.

EPFO ही सरकारी संस्था असल्यामुळे लोकांचा असा विश्वास आहे की येथे पैसा सुरक्षित राहतो. तसेच, पीएफ गुंतवणुकीवर व्याजाच्या स्वरूपात मोठा परतावा देतो.

मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार,  EPFO ​​PF मधील निधीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेणार आहे. या निर्णयामुळे पीएफ खातेदारांना मिळणाऱ्या पैशात वाढ होणार असल्याचे समजत आहे.

शेअर बाजारामध्ये ईपीएफओ गुंतवणूक वाढवण्याच्या विचारात आहे. यासंदर्भात मंजुरीसाठी लवकरच अर्थमंत्रालयाशी संपर्क साधला जाणार आहे.

तसेच या संदर्भातील प्रस्तावाला मार्चच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. EPFO ​​ETF द्वारे शेअर बाजारात वार्षिक 5-15 टक्के गुंतवणूक करू शकते आणि उर्वरित रक्कम डेट सिक्युरिटीजमध्ये गुंतवली जाते.

EPFO Announcement

ईटीएफ विमोचन रक्कम कशी गुंतवायची याबाबत कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे नाहीत. मात्र, अनेक कर्मचाऱ्यांना पीएफमधील गुंतवणूक सुरक्षित नसल्याचे वाटले आहे.

केंद्र सरकारच्या एका निर्णयाने गुंतवणूकदारांच्या मनात खळबळ उडाली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना वाटत आहे कि,  भविष्यात आपली गुंतवणूक धोक्यात येईल.

जानेवारी 2023 पर्यंत, शेअर बाजारातील गुंतवणूक 10% होती तर अनुज्ञेय मर्यादा 15% आहे. EPFO ने 2015-16 मध्ये पहिल्यांदा शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली.

त्याची मर्यादा तेव्हा 5% होती, जी 2016-17 मध्ये 10% आणि 2017-18 मध्ये 15% पर्यंत वाढवण्यात आली आहे. 31 मार्च 2022 पर्यंत ETF द्वारे 1,01,712. 44 कोटींची गुंतवणूक. 11,00,953.66 कोटी रुपयांच्या एकूण गुंतवणुकीच्या हे 9.24% आहे.

शेअर बाजारात गुंतवणूक करणे धोक्याचे आहे. बरेच लोक शेअर बाजाराची गणना जुगारात करतात. अनेक कर्मचाऱ्यांना प्रश्न पडत आहे कि, आपण करत असलेली गुंतवणूक भविष्यासाठी सुरक्षित आहे? 

EPFO ला केंद्र सरकारने शेअर बाजारात गुंतवणुकीची परवानगी दिली तर या गुंतवणुकीला फटका बसू शकतो, हे कर्मचाऱ्यांना चांगलेच ठाऊक आहे.

Leave a comment

WhatsApp ग्रुप जॉईन करा!