Kadba Kutti Yojna: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी!! शासन देणार कडबा कुट्टी मशीनसाठी 20,000 रुपये पर्यंत अनुदान; त्वरित करा अर्ज…

Kadba Kutti Yojna: सरकार शेतकऱ्यांसाठी सतत नवनवीन योजना राबवत असते. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक प्रकारची मदत मिळते.

तसेच शेतामधील कामे सोप्या पद्धतीने करता यावी म्हणून अनेक अनुदान योजना अमलात आल्या आहेत. सध्या सरकारद्वारे कडबा कुट्टी मशीन अनुदान योजना सुरु करण्यात आली आहे.

WhatsApp Group (Join Now) Join Now

शेतकरी म्हण्टलं कि त्यांच्या कडे गाय, म्हैस, शेळी अशी जनावरे आलेच. शेतकऱ्यांना त्या जनावरांना चारा कापून टाकण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. हीच गोष्ट लक्षात घेत सरकार चाऱ्यासाठी कडबा कुटी मशीन खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान देत आहे.

अनुसूचित जाती आणि जमाती, महिला आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना कडबा कुटी मशीन खरेदी करण्यासाठी 50 टक्के म्हणजे 20,000 रुपयांच्या मर्यादेपर्यंत अनुदान दिल जाणार आहे. तसेच कडबा कुटी मशीनसाठी इतर शेतकऱ्यांना 16,000 रुपयापर्यंत अनुदान दिल जाणार आहे.

Kadba Kutti Yojna कडबा कुट्टी मशीनसाठी अर्ज करताना लागणारी आवश्यक कागदपत्रे; 

  • शेतीचा सातबारा (7/12 उतारा)
  • आधार कार्ड
  • जातीचा दाखला
  • बँक पासबुक
  • शेतीचा 8अ उतारा

Leave a comment

WhatsApp ग्रुप जॉईन करा!