जिल्हा परिषद शिक्षकांसाठी मोठी बातमी!! 34 जिल्ह्यांमध्ये केंद्र प्रमुखांसाठी मेगा भरती; त्वरित करा अर्ज…

Zilla Parishad Teachers Bharati: जिल्हा परिषद शिक्षकांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. आता लावरच तब्बल 34 जिल्ह्यांमध्ये 2 हजार 384 केंद्र प्रमुखांसाठी जागा भरल्या जाणार आहेत. या भारतीबद्दल सर्व माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.

या भरती अंतर्गत केंद्र प्रमुखांच्या  रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जाहिरात देखील प्रसिद्ध केली होती. राज्यामधील 34 जिल्ह्यांमध्ये 2 हजार 384 केंद्र प्रमुखांच्या रिक्त जागांसाठी भरती सुरु होणार आहे.

WhatsApp Group (Join Now) Join Now

६ जूनपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून चालू महिन्याच्या अखेरीस ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांनाही या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून केंद्रप्रमुख होण्याची इच्छा पूर्ण होणार आहे.

यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांनाही या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून केंद्रप्रमुख होण्याची इच्छा पूर्ण होणार आहे.

केंद्रप्रमुख हा प्रशासन आणि शिक्षक यांच्यातील दुवा मानला जातो. जिल्हा परिषद शाळांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुमारे 13 ते 16 शाळा केंद्रप्रमुखांना देण्यात आल्या आहेत. केंद्रप्रमुखांची ५०% पदे शिक्षकांमधून पदोन्नतीने भरली जातात.

मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत राहणाऱ्या रिक्त पदांपैकी 50% जागा ‘केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा 2023’ द्वारे भरल्या जातील.

३४ जिल्ह्यांत २ हजार ३८४ केंद्रप्रमुख पदे भरण्यात येणार आहेत. परंतु या पदासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय पन्नास वर्षे असावे, या अटीमुळे अनेक शिक्षक परीक्षेच्या संधीपासून वंचित राहणार असल्याचे समजत आहेत.

50 वर्षांवरील शिक्षकांना परीक्षेची संधी द्यावी, अशी मागणी होत आहे. तसेच ही मागणी मान्य न झाल्यास परीक्षेलाच उच्च न्यायालयात आव्हान देण्याची तयारी काही शिक्षकांनी सुरू केल्याचे दिसून येत आहे.

ऑनलाईन परीक्षा प्रक्रिया;

केंद्रप्रमुख होण्यासाठी शिक्षकांना ऑनलाइन परीक्षा द्यावी लागणार आहे. ऑनलाइन परीक्षा 200 गुणांची असेल आणि ती जूनच्या शेवटच्या आठवड्यात घेतली जाईल.

तर या 200 गुणांमध्ये बुद्धिमत्ता चाचणी आणि अभियोग्यता घटक असे दोन विभाग असणार आहेत.  दुसऱ्या विभागात शालेय शिक्षणाचे नियम आणि शैक्षणिक नवकल्पनांचा प्रवाह यावर अभ्यासक्रम असेल अशी माहिती समोर आली आहे.

या भरतीच्या अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Zilla Parishad Teachers Bharati

Leave a comment

WhatsApp ग्रुप जॉईन करा!